सरकारी नोकरीची मोठी संधी! AIIMS मध्ये १,४८४ पदांसाठी मेगा भरती, पात्रता तपासून घ्या..

जून 16, 2026 5:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) ने सामायिक भरती परीक्षा अंतर्गत गट ‘ब’ आणि गट ‘क’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीद्वारे देशभरातील विविध एम्स संस्था आणि इतर आरोग्य संस्थांमधील एकूण १,४८४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. AIIMS Recruitment 2026

AIIMS Bharti 2026

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून, ३० जून २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. AIIMS Bharti 2026

पदाचे नाव :
ग्रुप B & C (असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे)

शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी

वयोमर्यादा काय आहे?

विविध भरती पदांसाठी कमाल वयोमर्यादा २७ वर्षे, ३० वर्षे आणि ३५ वर्षे आहे. पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी असेल. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये सवलत दिली जाईल. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) उमेदवारांना ५ वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना ३ वर्षांची आणि दिव्यांग उमेदवारांना १० वर्षांची वयोमर्यादा सवलत मिळेल.

अर्ज शुल्क :

उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. सर्वसाधारण आणि इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गासाठी शुल्क ₹३,००० आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹२,४०० आहे. दिव्यांग (PwBD) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क पूर्णपणे माफ आहे. शुल्क ऑनलाइन भरता येईल.

निवड कशी केली जाईल?

भरती प्रक्रियेअंतर्गत निवडीसाठी संगणक-आधारित चाचणी (CBT) घेतली जाईल. एम्सने (AIIMS) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ही परीक्षा २५ जुलै ते २७ जुलै २०२६ दरम्यान घेतली जाईल. परीक्षेची तारीख, प्रवेशपत्र आणि इतर महत्त्वाची माहिती वेळोवेळी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now