---Advertisement---
बातम्या महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्राचे कृषीमंत्री कोकाटेंना कोर्टाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२५ । महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate) आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक (Nashik) जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री आहेत.

manikrao kokate

नेमकं प्रकरण काय?
खरंतर 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर होता. 1995 ते 97 काळात सरकारच्या 10 टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात सारकवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

---Advertisement---

गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक जिल्हा न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. अखेर आज याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते असे बोललं जात आहे.

माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे जर याला वरच्या कोर्टाने स्थगिती दिली नाही, तर मात्र त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---