⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | तब्बल ५० वर्षांनी वर्ग मित्र-मैत्रिणीची झाली सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट

तब्बल ५० वर्षांनी वर्ग मित्र-मैत्रिणीची झाली सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१ । एरंडोल येथील सन १९७१/७२ च्या इयत्ता ११ वी च्या वर्गातील वर्ग मित्र तब्बल ५० वर्षा नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले असल्याचा योग नुकताच आला आहे. या जगात कोणीही एवढा श्रीमंत नाही की आपलं बालपण किंवा तारूण्य परत मिळवू शकेल.फक्त मित्रच वेळोवेळी गत स्मृतीची आठवण देऊन आपल्याला चिरतरूण ठेवु शकतात.असाच काहीसा सुवर्ण क्षणांचा अनुभव एरंडोल येथील रा.ति.काबरे विद्यालयाच्या  वर्ष १९७१- ७२ च्या इयत्ता ११ वी तील वर्गमित्रांनी हाॅटेल कृष्णा इन एरंडोल येथे अनुभवला.

तब्बल ५० वर्षांनंतर इ. ११ वी चे वर्गमित्र व्हॅटसप च्या माध्यमातून राम पाठक यांनी जोडले. प्रदिर्घ मैत्रीमुळे प्रत्यक्ष भेटीची ऊत्कंठा सर्वांची जागृत झाली.त्या साठी एरंडोल येथील वर्गमित्र  नगरसेवक माजी नगराध्यक्ष डाॅ सुरेश पाटील व  रमेश निंबा माळी यांनी पुढाकार घेऊन व गृप व्यवस्थापक राम विष्णु पाठक(नासिक) यांच्या सहकार्याने स्नेहसंमेलनाचा घाट घालण्यात आला.

सर्व वर्ग मित्र ६५- ६७ वयोगटातील निवृत्त डाॅ किशोर गाढवे, इंजि.राजेंद्र साळी, ऊ.पो.आयुक्त प्रविणचंद्र तिवारी, एम.डी.शिरीष जोशी,महसुल अधिकारी किशोर देशपांडे, वरिष्ठ प्रबंधक प्रमोद काश्यपे,मुख्याध्यापक प्रभाकर पाटील सहभागी झाले होते.पुणे,मुंबई, बडोदा,अकोला आदी शहरातून सर्व मित्र एकत्र आले होते.शनिवारी एरंडोल स्थित सहज उपलब्ध असलेले त्यांचे प्रियगुरूजन शिक्षक डी.एस पाटील,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त योगशिक्षक श्री बडगुजर व एस.व्ही पाटील सर यांचा सत्कार करण्यात आला.त्यांना यथोचित स्वागत व स्मृतीचिन्ह देण्यात आले. त्यांचे स्वागत विश्वनाथ लोहार,युवराज महाजन, सुभाष चौधरी, राध्येशाम त्रिपाठी, लोटन अहीरे, दत्तात्रेय सोनार, ह्यांनी केले तसेच एस.एम. महाजन सरांचे घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या संमेलनात महत्त्वाचे म्हणजे बरेच सभासद  त्यांच्या सहचारीणीसह उपस्थित होते.त्यामुळे कार्यक्रमास अधिक रंगत आली होती.एरंडोल स्थित सर्व परिचित प्रतिष्ठीत समाज सेवक लोकनेते,व्यापारी सर्व वर्ग मित्र दुर्गादास महाजन, धनंजय परदेशी, पुरुषोत्तम पवार, किशोर मानुधने, प्रमोद जोशी यांनी कार्यक्रम च्या नियोजनात उपस्थित राहुन योगदान दिले. याप्रसंगी गेल्या 50 वर्षात व कोरोनाच्या महामारीत गमावलेल्या गुरूजन, मित्र व  परिवारातील सदस्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.रात्री करमणुकीचे आयोजन झाले त्यात प्रविण तिवारी, किशोर देशपांडे, डाॅ सुरेश पाटील, राम पाठक आदींनी गाणे, कविता वाचन केले.

रविवारी पद्मालय येथे दाळबाटीचा विशेष मेनु ठेवण्यात आला या प्रसंगी विशेष आमंत्रित  लोकप्रिय माजी आमदार व शालेय मित्र बापुसाहेब महेंद्र पाटील व माजी तालुका सभापती व पद्मालय संस्थानचे विश्वस्त माधवराव पाटील यांनी सदर ऊपकमाचे कौतुक केले व सर्वांना गौरविले. अतिशय  भावपूर्ण वातारणात या मेळाव्याचा समारोप झाला. त्याप्रसंगी सर्वांना स्मृतीचिन्ह वाटण्यात आले.५० वर्षानंतर वयाच्या  ६५ – ६७ व्या वर्षी ही संजीवनी सर्वांना नवऊर्जा देऊन गेली.या निमित्ताने आपण ठरविल्यास आपण पुन्हा दरवर्षी असा स्नेहमेळावा करू शकतो असा विश्वास डाॅ किशोर गाढवे सह सर्व मित्रांनी दिला.याप्रसंगी सर्वांच्याच चेह-यावर एक समाधान व मित्रभेटीचा आनंद होता.या कार्यक्रमाचे संपुर्ण आयोजन डाॅ सुरेश पाटील, रमेश माळी तसेच प्रभाकर पाटील यांनी केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.