ग्रामीण भागात मिळणाऱ्या घरकुल योजनेच्या लाभाच्या रक्कमेत वाढ करा ; ॲड.देवकांत पाटलांचे निवेदन

जळगाव लाईव्ह लाईव्ह । २६ डिसेंबर २०२२ । ग्रामीण भागात मिळणाऱ्या घरकुल योजनेची लाभाची रक्कमेत वाढ करून मिळावी यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा विरावली ग्रामपंचायत सदस्य ॲड.देवकांत बाजीराव पाटील यांनी यावल गट विकास अधिकारी प स यावल मंजुषा गायकवाड यांना निवेदन देत प्रशासनास केली.

विनंती या संदर्भात सी एम ओ कार्यालयाला cm.maharashtr.gov.in या मेल वर राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, महाराष्ट्र राज्य अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार त्यास प्रमाणे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार मेल करत महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागात मिळणाऱ्या घरकुल योजनेची मिळणारी लाभाच्या (रक्कमेत ) अनुदानात वाढ करून मिळावी म्हणून केली मागणी संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागात घरकुल योजनेत पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना,शबरी आवास योजना अंतर्गत लाभाची मिळणारी रक्कम(120000) एक लाख वीस हजाराच्या जवळपास मिळत असते. हीच रक्कम शहरी भागासाठी(270000) दोन लाख सत्तर हजाराच्या जवळपास आहे तरी ग्रामीण भागात व शहरी भागातील ही मोठी तफावत आहे

ग्रामीण भागासाठी ही दोन लाख 70 हजार किंवा त्यापेक्षा जास्त निधी घरकुलांसाठी उपलब्ध करून मिळावा कारण शहरी भागापेक्षा जास्त खर्च हा ग्रामीण भागात होत असतो दळणवळणाच्या वाहतुकीच्या जास्तीचा खर्च येतो आणि आज वाळू अंदाजे 17000 डम्पर प्रमाणे सिमेंट 350 रुपये बॅग प्रमाणे असारी 6200 रुपये क्विंटल असून बांधकाम मजुरी यांचे सर्व दर गगनाला भिडले असता इतक्या कमी एस्टीमेंट मध्ये घर बांधणे शक्य नाही शिवाय घर बांधकामा व्यतिरिक्त घराला खिडक्या, दरवाजे, इलेक्ट्रिक वीज फिटिंग,नळ फीटिंग ,यासारख्या असंख्य गोष्टी या घरासाठी आवश्यक असतात तरी या तटपुंज्या अनुदानात घरकुल मध्ये घर बांधणे शक्य होत नसल्याने ज्यांना लाभ मिळालेला आहे त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तरी महाराष्ट्र शासनाने या विषयात त्वरित दखल घेऊन लवकरात लवकर पंतप्रधान आवास योजना ,रमाई घरकुल योजना ,शबरी घरकुल योजना या योजनांच्या अनुदानात वाढ करून महाराष्ट्रातील जनतेस त्यांच्या चांगल्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जन हिताचा निर्णय घेतल्यास प्रत्येक लाभार्त्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल असे दिलेल्या पत्रात मागणी केली आहे.

या पत्राची प्रत माहितीस्तव महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार ग्रामीण घरकुल विभागावर नियंत्रण असणारे व अंबलबाजावनी करणारे राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभाग सिडको भवन मजला सी.बी.डी बेलापूर नवी मुंबई.कार्यालय याचे सह रावेर यावल लोकसभेचे लोकप्रिय आमदार श्री दादा चौधरी यांना देखील पत्र पाठवून आपण विधानसभेत याबाबत पाठपुरावा करण्याची विनंती करणार असून जिल्हाधिकारी, जळगांव मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.जळगांव.गटविकास अधिकारी पं स यावल जि.जळगांव .या सर्वांना पत्र व मेल पाठवत करत मागणी केली असून लवकरात लवकर ही मागणी मान्य करून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा द्यावा अशा आशयाचे मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून युवक तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य विरावली ॲड देवकांत पाटील यांनी केली आहे .