गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या ; यावल तालुक्यातील घटना

ऑक्टोबर 27, 2021 4:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ ।  यावल तालुक्यातील कासारखेडा येथील विकास पुना कुंभार (वय-४९) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी दुपारी उघडकीस आलीय. त्यांच्या आत्महत्यामागील कारण अद्यापही कळू शकले नाहीय. दरम्यान, याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.

crime jpg webp

याबाबत असे की, कासारखेडा येथील विकास कुंभार हे मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, आज त्यांनी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना झोक्याच्या दोरीने छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे.

आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात कैलास पंढरीनाथ कुंभार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजिज शेख करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now