बातम्याजळगाव जिल्हा

सुरेश उज्जैनवाल यांची व्हाइस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । व्हाइस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उज्जैनवाल यांनी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, त्याच कामगिरीच्या बळावर व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष तथा संपादक संदीप काळे यांनी ही नियुक्ती केली आहे.

sureshjainval jpg webp

जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये पत्रकारिता ही विचारधारा कायम राहावी. ज्या पत्रकारितेच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो, ती पत्रकारिता शाबूत राहावी, सुरक्षित राहावी, यासाठी निर्माण झालेल्या व्हाइस ऑफ मीडिया या नोंदणीकृत संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांची नियुक्ती झाली आहे. उज्जैनवाल यांनी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, त्याच कामगिरीच्या बळावर व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष तथा संपादक संदीप काळे यांनी ही नियुक्ती केली आहे.

व्हाईस ऑफ मीडिया ही ५० ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारिता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली संघटना आहे. देशातील १७ राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत आहे. कोरोनाच्या संकट काळात १३६ पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संघटनेने १३६ पत्रकारांच्या १५० पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली.

Related Articles

Back to top button