धक्कादायक ! जळगाव जेलमध्ये अंतर्गत वादातून कैद्याचा खून

जुलै 10, 2024 10:28 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२४ । जळगाव जिल्हा कारागृहातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. खून प्रकरणात जळगाव जेलमध्ये कैदी असलेल्या आरोपीची अंतर्गत वादातून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आलीय. मोहसीन असगर खान (वय ३४) असे हत्या झालेल्या कैद्याचे नाव असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

jalgaon jail murder jpg webp

याबाबत असे की, ऑक्टोबर २०१९ मध्ये भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात ( वय ५५) यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर एका टोळक्याने हल्ला केला होता. यात रवींद्र खरात यांच्यासह एकूण पाच जणांचे बळी गेल्याने परिसर हादरला होता पुर्व वैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून ते जळगाव कारागृहात आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी मोहसीन असगर खान याचे दुसरा आरोपी याच्याशी काल दुपारी भांडण झाले. दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफुस सुरू होती. या अनुषंगाने रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास दुसर्‍या आरोपीने याने मोहसीन असगर खान याच्यावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले. असगरला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले.

जळगाव कारागृह हे आधी देखील अनेक गैरकृत्यांमुळे कायम चर्चेत असतांना आता थेट जेलमधील कैद्याचा थेट खून झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून कर्तव्यात कसूर करणार्‍यांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मयत असगर याचा मृतदेह हा जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला होता. तर पोलीसांनी जेलकडे धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे. या माध्यमातून भुसावळातील गँगवार हे जेलमध्ये देखील पोहचल्याचे दिसून आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now