यावल येथील आठवडे बाजार उद्या राहणार बंद ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जून 25, 2026 2:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मुस्लिम बांधवांचा पवित्र मोहरम सण उद्या शुक्रवार, २६ जून रोजी साजरा होत असून या पार्श्वभूमीवर यावल शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मोहरमच्या दिवशी यावलमध्ये भरणारा नियमित आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी जारी केले आहेत.

yawal athvale bajar jpg webp

मोहरम सणानिमित्त धार्मिक कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता असून २६ जून रोजी शुक्रवार असल्यामुळे नियमित आठवडे बाजारासाठी देखील नागरिक व व्यापारी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. परिणामी शहरात वाहतूक कोंडी निर्माण होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही बाब विचारात घेऊन जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी मुंबई मार्केट अॅण्ड फेअर्स अधिनियम, १८६२ मधील कलम ५ (अ) व (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक २६ जून २०२६ रोजी यावल शहरात भरण्यात येणारा नियमित आठवडे बाजार बंद ठेवण्याचा आदेश निर्गमित केला आहे.तसेच नागरिक व व्यापाऱ्यांच्या सोयीचा विचार करून सदर आठवडे बाजार अन्य दिवशी भरविण्याबाबत संबंधित यंत्रणांना आदेश देण्यात आले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now