10वी पाससाठी महाराष्ट्र सरकारच्या नोकरीच्या मोठी संधी! शेकडो पदावर भरती, पगार ४७,६०० पर्यंत

मे 8, 2026 2:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागात ‘चौकीदार’ पदाच्या एकूण ४१६ जागांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे केवळ १० वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना या सुवर्णसंधीचा लाभ घेता येणार आहे. Adivasi Vikas Vibhag Bharti 2026

job jpg webp

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या tribal.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम दिनांक 18 मे 2026 (11:55 PM) पर्यंत आहे.शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पदाचे नाव : चौकीदार
शैक्षणिक पात्रता :
या भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी/SSC) उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा (१ एप्रिल २०२६ रोजी):
खुला प्रवर्ग (General): १८ ते ३८ वर्षे
मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ (OBC/SC/ST/EWS): १८ ते ४३ वर्षे (नियमानुसार ५ वर्षांची सूट)
दिव्यांग: कमाल ४५ वर्षांपर्यंत

परीक्षा शुल्क (Application Fee):
अमागास (खुला प्रवर्ग): ₹१,०००/-
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹९००/-
माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक: कोणतेही शुल्क नाही (फी माफ).

पगार (Salary) : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १५,००० ते ४७,६०० पर्यंतचा पगार मिळेल

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now