आदिवासी विकास विभागात ‘चौकीदार’ पदासाठी जम्बो भरती; १०वी पाससाठी संधी, पगार ४७६०० पर्यंत

एप्रिल 28, 2026 3:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागात ‘चौकीदार’ पदाच्या एकूण ४१६ जागांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे केवळ १० वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना या सुवर्णसंधीचा लाभ घेता येणार आहे. Adivasi Vikas Vibhag Bharti 2026

adivasi vikas vibhag bharti

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या tribal.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम दिनांक 18 मे 2026 (11:55 PM) पर्यंत आहे.शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पदाचे नाव : चौकीदार
शैक्षणिक पात्रता :
या भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी/SSC) उत्तीर्ण केलेली असावी.

वयाची अट आणि सवलत

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ एप्रिल २०२६ रोजी किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षांपर्यंत असावे. नियमानुसार, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

परीक्षा शुल्क (Application Fee)

अमागास (Open): ₹१०००/-
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹९००/-
माजी सैनिक: कोणतीही फी आकारली जाणार नाही.

पगार (Salary) : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १५,००० ते ४७,६०० पर्यंतचा पगार मिळेल

आदिवासी विकास विभागातील ही भरती संपूर्ण महाराष्ट्रात होणार असल्याने उमेदवारांना आपल्या जवळच्या जिल्ह्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील यावलच्या प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पमध्ये देखील काही रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now