जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२४ । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक असून मात्र त्यापूर्वी राज्यात एक मोठी बातमी समोर आलीय. भाजपचे नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आज मंगळवारी विरार पूर्वला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. यावेळी त्यांनी ५ कोटी रुपये वाट्ल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला आहे.
या आरोपाखाली त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केलीय. निवडणूक आयोगाने आता लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केलाय. तावडे यांच्यासह भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.