⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

महिला हवालदारवर हाथ उगरणाऱ्या आरोपी महिलेस शिक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । कर्तव्य बजवात असलेल्या महिला हवालदारची हुज्जत घालत, शिविगाळ, धक्का बुक्की, आरडाओरड करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकणी जिल्हापेठ पोलीसांत गुन्हा दाखल असलेल्या आरोपी महिलेस. दि. ३०एप्रिल रोजी न्यायालयाने 100 रु.दंडाची शिक्षा सुनावली.

अधिक माहिती अशी की, दि. 13 एप्रिलरोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास महिला कॉन्स्टेबल कविता विसपुते या बेंडाळे चौकात येणारे जाणारे वाहनांचे कागदपत्रे तपासण्याचे काम करीत असताना आरोपी रेखा डिगंबर जाधव या पांढऱ्या ऍक्टिवावर तिथून जात असताना कविता पिसपुते यांनी आरोपी महिलेस लायसेन्सची मागणी केल्याचा तिला राग येऊन सदर महिलेने विसपुते यांच्याशी हुज्जत घातली, व लायसेन्स न बाळगल्या मुळे दंड भरण्याचे सांगितल्याचा राग येऊन रेखा जाधव हिने सदरील महिला कॉन्सटेबल यांच्या उजव्या गालावर चापट मारली, शिविगाळ , धक्का बुक्की, आरडाओरड करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून रेखा जाधव हिच्या विरुध्द जिल्हापेठ पोलीसांत गुन्हा दाखल होता. दि. 30 एप्रिलरोजी आरोपी महिलेस 3 महिने साधी कैद व 500 रु. दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद, 3 महिने साधी कैद व 200 रु.दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद, 3 महिने साधी कैद व 300 रु दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद, मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 130 चे उल्लंघन केल्यामुळे कलम 177 अन्वये 100 रु. दंडाची सजा 3 रे तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. बोहरा यांनी ठोठावली, सरकार पक्षातर्फे सरकरी वकील अनुराधा लक्ष्मण वाणी यांनी तर आरोपी तर्फे ऍड. पंकज पाटील यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी झरीना तडवी यांनी मोलाची भूमिका पार पाडली.