---Advertisement---
बातम्या राजकारण राष्ट्रीय

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर ; रक्षा खडसेंना मिळाले हे खाते..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२४ । भारताचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यांच्यासोबत रावेरच्या खासदार रक्षा खडसें यांच्यासह अनेक खासदारांना मंत्रिपदाची शपथ दिली गेली. मात्र कोणाच्या वाटेला नेमकं कोणतं खाते मिळेल? याबाबतची उत्सुकता होती. आता याबाबतची उत्सुकता संपली असून मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. रक्षा खडसे यांना क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे

raksha khadse jpg webp

या खातेवाटपात 30 केंद्रीय मंत्र्यांसाठीचं खातेवाटप, 5 राज्यमंत्र्यांना स्वतंत्र प्रभार तर 20 राज्यमंत्र्यांसाठी विविध खात्यांचं वाटप करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 6 खासदारांची निवड झाली आहे. यापैकी 2 खासदारांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद तर खासदार रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ आणि रामदास आठवले यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. या सर्व केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांसाठी आता खातेवाटप जाहीर झालं आहे.

---Advertisement---

महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नितीन गडकरी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाचं स्थान आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा परिवहन आणि रस्ते विकास मंत्रालय देण्यात आलं आहे. तर पियूष गोयल यांना पुन्हा एकदा वाणिज्य खातं देण्यात आलं आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर 4 राज्यमंत्र्यांसाठी देखील खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहोळ यांना कोणतं खातं?
रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आलेल्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लावण्यात आली आहे. रक्षा खडसे यांना क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचं स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---