चार हजाराची लाच घेताना जळगावातील कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

ऑक्टोबर 20, 2021 7:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । ना-हरकत दाखला/संमती पत्र देण्याच्या मोबदल्यात चार हजारांची लाच मागणी करणार्‍या जळगाव जिल्हा निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास जळगाव एसीबीच्या पथकाने आज बुधवारी रंगेहात अटक केली. यामुळे लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

anti corruption jpg webp

विनोद रमेश सोनवणे (46, रा.रीधुर वाडा, शनीपेठ, जळगाव) असे लाच घेणाऱ्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. संशयीताविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, ४६ वर्षीय तक्रारदार यांना निमखेडी शिवारात असलेली एका सहकारी संस्थेमधील सदनिका खरेदी करणार असल्याने खरेदीकामी त्यांनी उपनिबंधक कार्यालयाकडून ना हरकत दाखला मिळण्यासाठी त्यांनी जळगाव जिल्हा निंबधक कार्यालयात ना हरकत दाखला मिळावा यासाठी कनिष्ठ लिपीक विनोद सोनवणे  यांनी ५ हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती ४ हजार रूपये मागणी केल्याचे सिध्द झाल्याने त्यांना लाचलुचपत विभागाने अटक केली. लाचखोर विनोद सोनवणे याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई नाशिक अधीक्षक सुनील कडासने, प्रभारी अपर अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलीस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस अंमलदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ आदींच्या पथकाने केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now