⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

अभिमान महाराष्ट्राचा जीवन गौरव पुरस्कार रवीद्र वंजारी यांना प्रदान

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । येथील जिल्हा पोलिस दलात कार्यरत पोलीस नाईक रवी वंजारी यांना अभिमान महाराष्ट्राचा जीवन गौरव पुरस्कार २०२१-२२ प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार डायनामीक युथ स्पोर्ट अकॅडमी , महाराष्ट्र यांच्या मार्फत देण्यात येत असतो , या वर्षीचा पुरस्कार हा रवी वंजारी यांना जाहीर करण्यात आला होता. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके ऑडिटोरियम पनवेल नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. रवींद्र यांचा जन्म बोदवड गावातील अंत्यत गरीब कुटंबात झाला. मात्र त्याना व्यायामाची खूप आवड होती. त्यानी त्या दृष्टीने तयारी केली. गरिबी हे कारण न समजता त्यांनी ती संधी समजली. संकटावर मात करून त्यांनी वडिलांनाही मदत केली. त्यांनी अनेक शरीरसौष्टव स्पर्धेमध्ये भाग घेऊन पोलीस दलाचे नाव जागतिक पातळीवर नेऊन जळगाव नाहीतर महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उंचावलेले आहे. तसेच आज पावेतो त्यांना अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहे.

विशेष म्हणजे क्रीडा क्षेत्रात युवकांनी पुढे जावे, यासाठी ते सोशल मीडियाच्या माध्यामातून युवकांना मार्गदर्शन करत असतात. त्यांना आतापर्यंत विविध पुरस्करांनी गौरविण्यात आले आहे. त्यांचा सामाजिक उपक्रमातही हिरारिने सहभाग असतो. सध्या भारत सरकारमार्फत सुरू असलेल्या फिट इंडिया मोहिमेतंर्गत शालेय तरुण मुलांना मार्गदर्शन ते करत असतात. आपण पोलिसांना मित्र समजावे ह्यासाठी ते प्रयत्न करत असतात. जागतिक महामारी करोना या काळात सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला.

सोशल मीडिया’च्या माध्यमातून आरोग्याविषयी जनजागृती

अनेक शहरी ग्रामीण भागातील जीवनावर याचा परिणाम झाला. अशा काळात देवदूत म्हणून अवतरले ते म्हणजे डॉक्टर आणि पोलिस सर्वत्र लॉकडाऊन असताना सर्वतोपरी मदत करण्यासाठी पोलिसांनी अहोरात्र मेहनत केली अशाच काळामध्ये त्यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून सर्वतोपरी आरोग्याविषयी जनजागृती त्यांनी केली तसेच नागरिकांना करोना संदर्भात नागरिकांना मार्गदर्शन देखील केले. तसेच सामाजिक बांधिलकी जपून त्यांनी अनेक गोरगरीब कुटुंबांना सॅनिटायझर, मास्क तसेच धान्य व जेवण देखील पुरवले वेळोवेळी रवींद्र वंजारी यांनी नागरिकांना मदत करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. त्यांच्या या कार्यबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असे. डायनामीक युथ स्पोर्ट अकॅडमी , महाराष्ट्र चे चेअरमन मा. जयेश चौगुले ह्यांनी सांगितले

यांनी कौतुक केले

पुरस्कार मिळाल्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधिक्षक (गृह) विठ्ठल ससे, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी देखील आनंद व्यक्त करून रवींद्र वंजारी यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.