भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरघोस पगाराच्या नोकरीची संधी; पात्रता जाणून घ्या

डिसेंबर 17, 2025 1:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) सिनियर असिस्टंट आणि ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्यासाठी ऑनलाइन अर्ज फॉर्म जारी करण्यात आला आहे. अर्ज प्रक्रिया १२ डिसेंबरपासून सुरू झाली. AAI Recruitment 2025

AAI Bharti

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२६ आहे. या नोकरीसाठी तुम्ही www.aai.aero या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. AAI Bharti 2025

शैक्षणिक पात्रता :
एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन / रेडिओ इंजिनियरिंगमध्ये २ वर्ष काम केलेले असावे. ज्युनिअर असिस्टंट (एचआर) पदासाठी ग्रॅज्युएशन केलेले असावे.ज्युनिअर असिस्टंट (फायर सर्व्हिसेस) पदासाठी १० वी पास असावे त्याचसोबत ३ वर्षांचा ऑटोमोबाईल / फायर रेग्युलर डिप्लोमा केलेला असावा.

एअरपोर्ट ऑथोरिटीमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीद्वारे होणार आहे. ज्युनिअस असिस्टंट पदासाठी कॉम्प्युटर लिट्रसी टेस्ट घेतली जाणार आहे.

अर्ज शुल्क :
सामान्य, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ₹१,००० भरावे लागतील. तथापि, महिला उमेदवार, अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग, माजी सैनिक आणि ज्यांनी एएआयमध्ये एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे त्यांना अर्ज शुल्कातून पूर्णपणे सूट आहे. असे उमेदवार मोफत अर्ज करू शकतात.

किती पगार मिळेल?
सिनियर असिस्टंट पदासाठी ३६,००० ते १,१०,००० रुपये पगार मिळणार आहे तर ज्युनिअर असिस्टंट पदासाठी ३१००० ते ९२००० रुपये पगार मिळणार आहे.

अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला www.aai.aero वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर तुम्हाला साइन इन करायचे आहे. त्यानंतर तुमची सर्व माहिती भरायची आहे.
यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचे आहे.
यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. त्यामध्ये तुमची माहिती, शैक्षणिक माहिती भरायची आहे.
यानंतर तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायची आहे. यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now