एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! 976 पदांची भरती सुरू, 140000 पर्यंत पगार मिळेल..

ऑगस्ट 29, 2025 11:05 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने मोठी पदभरती जाहीर केली आहे. एकूण ९७६ रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार असून या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही.

AAI Bharti

इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.aai.aero ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर एक्झिक्युटिव (Architecture)11
2ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering‐Civil)199
3ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering‐Electrical)208
4ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering‐ Electronics)527
5ज्युनियर एक्झिक्युटिव (IT)31

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: (i) आर्किटेक्चर पदवी (ii) GATE 2023/2024/2025
पद क्र.2: (i) BE./B.Tech (Civil) (ii) GATE 2023/2024/2025
पद क्र.3: (i) BE./B.Tech (Electrical) (ii) GATE 2023/2024/2025
पद क्र.4: (i) BE./B.Tech (Electronics/ Telecommunications/ Electrical) (ii) GATE 2023/2024/2025
पद क्र.5: (i) BE./B.Tech (Computer Science/ Computer Engineering/ IT / Electronics) किंवा MCA (ii) GATE 2023/2024/2025

वयोमर्यादा

२७ सप्टेंबर २०२५ रोजी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे कमाल वय २७ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय, उमेदवारांना वयात सूट देखील दिली जाईल. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षे, ओबीसी उमेदवारांना वयोमर्यादेत ३ वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना वयोमर्यादेत १० वर्षे सूट दिली जाईल.

किती पगार दिला जाईल
निवडलेल्या उमेदवारांना दरमहा पगार ४०,००० ते १,४०,००० रुपये दिले जातील.

अर्ज शुल्क

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. सामान्य आणि ओबीसी उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ३०० रुपये ऑनलाइन भरावे लागतील. याशिवाय, जर अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांनी एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल तर त्यांना अर्ज शुल्कात सूट दिली जाईल.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चांगल्या कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला लाखो रुपये पगारदेखील मिळणार आहे. तुम्हाला २८ तारखेनंतर अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now