---Advertisement---
गुन्हे चाळीसगाव जळगाव जिल्हा

चाळीसगाव हादरलं : प्रेमसंबंधातून महिलेवर बलात्कार करून हत्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्युज : ४ एप्रिल २०२४ : चाळीसगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. प्रेमसंबंधातून एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना वरखेडे (ता. चाळीसगाव) येथे उघडकीस आली. याप्रकरणी याबाबत मेहुणबारे (ता. चाळीसगाव) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत एकास अटक करण्यात आली आहे. संजय धोंडा गायकवाड (३१, रा. वरखेडे खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

crime jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला बुधवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान गावालगतच्या खडक्या नाल्यात शौचासाठी गेली होती. ती लवकर घरी परत न आल्याने मुलांनी तिचा शोध घेतला. त्यावेळी गिरणा नदीपात्रात वाळूमध्ये अर्धवट पुरलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिस पाटील संतोष तिरमली यांनी मेहुणबारे पोलिसांना माहिती दिली.

---Advertisement---

पंचनामा केला असता महिलेच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत महिलेच्या दिराने आढळला. प्रेमसंबंधातून महिलेचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याबाबत मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठ तास मृतदेह पडून
आरोपीना अटक करण्यात यावी, श्वानपथक बोलावण्यात यावे, त्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृत महिलेच्या नातेवाइकांनी घेतली होती. त्यामुळे मृतदेह तब्बल ८ तास मृतदेह पडून होता. नंतर फॉरेन्सिक विभागाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर मेहुणबारे पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप परदेशी, फौजदार गोपाल पाटील, पोकॉ. भूषण बाविस्कर, संजय पाटील, फॉरेन्सिकचे अधिकारी हरीश परदेशी तसेच नायब तहसीलदार चाळीसगाव आदींनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---