⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | गुन्हे | मोठी बातमी! मुक्ताईनगर नजीक अवैध गुटख्याने भरलेला ट्रक पकडला

मोठी बातमी! मुक्ताईनगर नजीक अवैध गुटख्याने भरलेला ट्रक पकडला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२४ । मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणारा ट्र्क मुक्ताईनगर तालुक्यातील बर्‍हाणपूर चौफुली येथे रात्री पकडण्यात आल्याची बातमी समोर आलीय. यामुळे खळबळ उडाली आहे.

नाशिक येथील आयजी यांच्या अंतर्गत असलेल्या पथकाने रात्री बर्‍हाणपूर चौफुलीजवळ एचआर ५५ एक्यू ३८७३ क्रमांकाच्या कंटेनरला अडवून तपासणी केली असता यात पूर्णपणे महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा आढळून आला. यामुळे संबंधीत पथकाने कंटेनरसह यातील गुटख्याचा साठा जप्त केला आहे.

दरम्यान, हा साठा नेमका किती रूपयांचा आहे याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी याचे मूल्य लाखोंच्या घरात असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.