खंडेरावनगरात कुजलेल्या अवस्थेत आढळले तीन दिवसाचे अर्भक

नोव्हेंबर 5, 2021 5:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२१ । बांधकाम सुरु असलेल्या घरात प्लास्टिकच्या गोणीत ठेवलेले तीन दिवसांचे अर्भक कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याची घटना जळगाव शहरातील खंडेराव नगरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Khanderao Nagar jpg webp

खंडेराव नगरात एका घराचे बांधकाम सुरू असून शुक्रवारी सकाळी परिसरात दुर्गंधी सुटल्याने नागरिकांनी या ठिकाणी पाहणी केली असता शौचालयाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्लास्टिकच्या गोणीत तीन दिवसाचे नवजात बालक कुजलेल्या स्थितीत आढळून आले. यामुळेच दुर्गंधी सुटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांनी रामानंदनगर पोलिसांना याघटनेबाबत माहिती दिली.

माहिती मिळाल्यावर रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख, सागर देवरे, नितेश बच्छाव, भूषण पाटील, अतुल चौधरी, संजय तडवी, रेवानंद साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी अर्भक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून मध्यरात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी हे अर्भक ठेवले असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान याप्रकरणी रामानंदनगर पाेलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now