---Advertisement---
भडगाव

भडगावचा कट्टर शिवसैनिक भाजपात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । भडगाव तालुक्यातील वाक येथील कट्टर शिवसैनिक व युवासेनेचा वाक चा गटप्रमुख रूपेश कांतीलाल पाटील यांनी आज भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर भाजपा युवानेते अमोल शिंदे यांच्या हस्ते भाजपा कार्यालयात पक्ष प्रवेक्ष केला. यावेळी रूपेश पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत जय श्रीराम च्या घोषणा दिल्या.

jalgaon 2022 10 26T190202.048 jpg webp

या वेळी रूपेश पाटील यांनी सांगितले की, मी शिवसेना या पक्षात गेल्या बारा वर्षांपासून काम करत होतो. मी युवासेनेचा वाक येथील गटप्रमुख म्हणून एकनिष्टने काम करत होतो. तरी माझी कुणीही दखल घेतली नाही. मला योग्य तो न्याय मिळाला नाही. मी अंतर्गत कलहाला कंटाळलो म्हणून मी आज भा.ज.पा पक्षात प्रवेश केला असून मला अमोल शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. तरी मला भा.ज.पा.त योग्य न्याय मिळेल म्हणून मी प्रवेश केला. या पक्ष प्रवेश वेळी युवानेते अमोल शिंदे, सोमनाथ पाटील, अमोल पाटील, सागर महाजन, किरण शिंपी, विशाल चौधरी, बापू शार्दुल, धनराज पाटील, राहुल महाजन, आदी उपस्थित होते

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---