भरधाव पिकअपची ॲपेरिक्षाला जोरदार धडक ; ६ जण जखमी

ऑगस्ट 7, 2025 4:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात अपघाताच्या डिसेंदिवस वाढताना दिसत असून अशातच पिकअप गाडीने पुढे असलेल्या ॲपेरिक्षाला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाल्याची घटना शिंदखेडा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर स्टेशनरोडवर असलेल्या परमार हॉटेल समोर घडली. जखमींना शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर धुळे येथे पाठवण्यात आले आहे.

dcd

या दुर्घटनेबाबत बुधवारी गणेश यशवंत माळी हे आपल्या परिवारातील सदस्यांसह स्टेशन रोडलगत असलेल्या शेतात ॲपेरिक्षाने (एमएच १५,सीके ६०६४) सकाळी खताच्या गोण्या घेऊन शेतात जात असताना शेता मागून येणाऱ्या पिकअप टाटा एस (एमएच १८,बीझेड १२२४) या गाडीने जोराची धडक दिली. पिक अप गाडीत सेंट्रिंगचे अवजड साहित्य होते. धडक जोरदार असल्याने अॅपेरिक्षा रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडल्याने गाडीच्या काचा फुटल्या व मोठ्या प्रमाणात गाडीचे नुकसान झाले आहे. पिक अप गाडीही कलंडली आहे. अपघात होताच त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. काही काळ वाहतूक ठप्पही झाली होती.

अपघातात जखमी झालेले प्रवासी या अपघातात गणेश यशवंत माळी, मीनाबाई यशवंत माळी, आशाबाई दीपक माळी, दीपक काशिनाथ माळी, महारू रामसिंग सोनवणे, सोमा रतन भील अपघातात जखमी झाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now