जळगावात आकाशातून पडला मोठा धातूचा तुकडा ; नागरिकांमध्ये घबराट

जुलै 6, 2025 6:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२५ । जळगाव शहरातील एमआयडीसी औद्योगिक वसाहतीत सायंकाळच्या सुमारास एक मोठा धातूचा तुकडा आकाशातून फॅक्टरीच्या भिंतीवर पडल्याने एकच खळबळ उडालीय. आकाशातून तुकडा भिंतीवर पडला तेव्हा मोठा आवाज झाल्यानं परिसरात भीतीचे वातावरण पसरलंय. हा तुकडा जवळपास १६ किलो वजनाचा असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी त्या धातूच्या तुकड्याला ताब्यात घेतले असून, तो सध्या MIDC पोलिस ठाण्यात ठेवण्यात आला आहे.

metal fell

याबाबत असे की, जळगाव शहरातील एमआयडीसीमधील अनुपमा इंडस्ट्रीज, S-10 या फॅक्टरीच्या भिंतीवर आकाशातून एक धातूचा तुकडा पडला. ही घटना घडली त्यावेळी परिसरात मोठा आवाज झाला आणि परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली. या घटनेमुळे जळगाव शहरात मोठी चर्चा सुरु झाली असून, अनेक नागरिकांनी ही बाब सोशल मीडियावर देखील शेअर केली आहे.

याबाबतची माहिती मिळताच जळगावचे प्रांताधिकारी विनय गोसावी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (DDMO) आणि MIDC पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी तातडीने त्या धातूच्या तुकड्याला ताब्यात घेतले असून, तो सध्या MIDC पोलिस ठाण्यात ठेवण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी सांगितले की, “हा तुकडा नेमका कुठून आला आहे, तो कोणत्या धातूचा आहे, याचा सध्या तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा तुकडा आकाशातून पडलेला असावा, मात्र तो कोणत्या यंत्राचा किंवा उपग्रहाचा भाग आहे का, याची खात्री करण्यासाठी तांत्रिक तपास केला जाणार आहे.” आहे.

प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून, तपास पूर्ण होईपर्यंत संयम बाळगावा असे सांगितले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु असून लवकरच याबाबत अधिकृत माहिती मिळेल, असे प्रशासनाने सांगितले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now