जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२२ । एरंडोल तालुक्यातील एका गावातील १७ वर्षे २ महीने वयाच्या अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी आमीष दाखवुन पळवुन नेल्याची घटना दि. ८ मंगळवार रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. ८ मंगळवार रोजी मुलीची आई शेतात कामास गेली होती व वडील पिठाच्या गिरणीवर कामास गेले होते. त्यावेळी मुलगी ही एकटीच घरी होती. तीची आई संध्याकाळी शेतातुन परतल्यावर घराला कुलुप लावलेले आढळुन आले. मुलीची चौकशी केली असता ती मिळुन आली नाही. तीच्या मोबाइल वर संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

सदर मुलीचा गावात शोध घेतला असता ती मिळुन आली नाही म्हणुन पित्याने शेवटी पोलिस ठाणे गाठुन आपल्या मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने आमीष दाखवुन, फूस लावून पळवुन नेल्याची तक्रार दिली. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड काँन्सटेबल राजेश पाटील, काशिनाथ पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
हे देखील वाचा:
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू










