---Advertisement---
गुन्हे जामनेर

VIDEO : धावत्या खासगी ट्रॅव्हलला भीषण आग, सुदैवाने मोठा अनर्थ टळला, बस जळून खाक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२५ । देशात खासगी ट्रॅव्हल बसला लागणाऱ्या आगीच्या घटना वाढताना दिसत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यात जामनेर पहूर मार्गावरील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ धावत्या खासगी ट्रॅव्हल बसला अचानक आग लागल्याची घटना आज दि २७ रोजी घडली. बसमधील प्रवाशांच्या सदर बाब लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने चालकाने गाडी थांबवली. आणि प्रवासी वेळीच उतरल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या घटनेनं प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

pahurbus

याबाबत असे की, पुणे संभाजीनगर मार्गाने बऱ्हाणपूर धारणी येथे जाणाऱ्या खाजगी लक्झरी बसने आज सकाळी अचानक पेट घेतला. बसचे टायर फुटल्याने अचानक धूर निघण्यास सुरवात झाली. बसमधील प्रवाशांच्या सदर बाब लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने चालकाने गाडी थांबवली. त्यावेळेस बसचे मागील टायराने पेट घेतलेला होता.

---Advertisement---


दरम्यान बसमध्ये तब्बल २५ प्रवासी होते. चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी करताच प्रवाशांनी खाली उतरले. गाडीतील सर्व प्रवाशांना सामानासह सुखरूप खाली उतरविण्यात आले. त्यानंतर थोड्याच वेळात पूर्ण गाडीने पेट घेतला. यावेळी जोरदार वारा सुरू असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य झाले असता प्रवाशांची धावाधाव केली. काही क्षणातच बस आगीच्या भक्षस्थानी सापडून जळून खाक झाली होती. सुदैवाने यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

दरम्यान स्थानिकांनी जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला घटनेची माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी येत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. सर्व प्रवासी, चालक वाहक सुरक्षित असून मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान पहूर- जामनेर रोडवर अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment