Pachora News-जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकर्याच्या शेतातून 15 शेळ्यांची चोरी करणार्या संशयीत आरोपीला पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी नगरदेवळा येथून अटक केली. आरोपीने बाजारात शेळ्या विकल्याची कबुली दिली आहे. पाचोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
अंनिस हकिम खाटीक असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. शेतकरी रवींद्र पंडित पाटील यांच्या शेतातून 5 ऑगस्ट रोजी मध्यरात्री चार चाकी वाहनातून अज्ञात चोरट्याने 15 शेळ्यांची चोरी केली होती. याबाबत रवींद्र पाटील यांनी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होता. अज्ञात चोरट्या बाबत पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना शेळ्या चोरणारा चोर नगरदेवळा येथील असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनतर पोलिसांनी मध्यरात्रीच नगरदेवळा येथे जावून अंनिस हकिम खाटीक यास अट केली. आरोपीने रवींद्र पाटील यांच्या शेतातून 60 हजार रुपये किंमतीच्या 15 शेळ्या विविध ठिकाणी बाजारात जावून विकल्याची कबुली दिली. बकर्या विक्री केलेल्या 60 हजार रुपयांपैकी 35 हजार रुपये जप्त करण्यात आले.
पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलिस नाईक गोकुळ सोनावणे, पोलिस नाईक रविंद्र पाटील, पोलिस हवालदार किरण ब्राम्हणे, पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, पोलिस कॉन्स्टेबल पंकज सोनावणे, पोलिस कॉन्स्टेबल मुकेश लोकरे यांनी ही कारवाई केली आहे.