गुन्हेचाळीसगावजळगाव जिल्हा

तळेगावात घर फोडले, साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२२ । चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे अज्ञात चोरट्याने बंद घराच्या गच्चीच्या जुन्यावरून घरात प्रवेश करत चक्क ५ लाख २८ हजारांच्या ऐवज चोरून नेल्याची घटना २३ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान घडली. ही चोरी संतोष सुधाकर राठोड यांच्या घरात झाली आहे.

चोरट्यांनी कपाटात ठेवलेले ४ लाख २५ हजार रुपयांची रोकड व ३६ हजार रूपये किंमतीची ९ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, २० हजार रूपये किंमतीचे ४० भार वजनाचे चांदीचे कडे, १५ हजाराच्या ३० भार वजनाच्या चांदीच्या साखळ्या व ३२ हजार रूपयांचे ८ ग्रॅमचे सोन्याचे मणी असा जवळपास ५ लाख २८ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. रात्री राठोड घरी आल्यानंतर चाेरी उघड झाली.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button