जळगाव जिल्हा

कुटुंबाचा रेल्वे रुळ ओलांडून शॉर्टकट जाण्याचा होता प्रयत्न, पण तितक्यात ट्रेन आली अन्.. जळगावात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 6 मार्च 2024 । गेल्या चार दिवसापूर्वी जळगाव रेल्वे स्टेशनवर चुकीच्या ट्रेनमध्ये बसल्याच लक्षात आल्यानंतर चालत्या रेल्वेतून उतरताना रेल्वेखाली ओढल्या गेलेल्या तरुणाला त्याचे दोन पाय गमवावे लागले. अशातच आता जळगाव रेल्वे स्थानकावर मोठा अनर्थ टळला. एका रेल्वेतून आउटर साईडने उतरल्यानंतर दुसऱ्या बाजूने रेल्वे आल्याने त्या कुटुंबाचा एकदमच गोंधळ उडाला. हे कुटुंब दोन धावत्या रेल्वेंच्या मधात अडकले. यावेळी बघ्यांचा पण काळजाचा ठोका चुकला. पण नशीब बलवत्तर म्हणून त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

नेमकं काय घडलं?
जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडी थांबल्यानंतर आऊटर साईडने दोन लहान मुलांसह काही प्रवासी उतरले. रेल्वे रुळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर शॉर्टकट जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण तेवढ्यातच दुसरी रेल्वे आली. एकदमच दुसरी रेल्वे आल्याने त्यांचा मोठा गोंधळ उडाला. दुसऱ्या बाजूने धावत्या रेल्वेच्या मधात हे प्रवासी अडकले. हे प्रवाशी जागेवरच खिळले.

या सर्व प्रकारामुळे मुले भांबवली. तर प्रवाशांनी आरडाओरड केल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलातील जवान धावून आले. त्यांनी या प्रकाराबद्दल प्रवाशांवर आरडाओरड करत संताप व्यक्त केला. दोन्ही गाड्या गेल्यानंतर प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले. तसेच त्यांचे साहित्य सुद्धा प्लॅटफॉर्मवर देण्यात आले. रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी प्रवासी शॉर्टकट वापरतात मात्र शॉर्टकट त्यांच्या जीवावर भेटू शकतो त्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून रेल्वे रूळ पार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button