आकृतीबंधावर लवकरच होणार निर्णय ? मनपात चर्चांना उद्गाण

जळगाव लाईव्ह न्युज | २५ मे २०२२ | महापालिकेतील ४२ कर्मचारी ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार असून या मुळे आता मनपात फक्त १००० कर्मचारी काम करत आहेत. आता याचा थेट फटका कर्मचाऱ्यांचा कामावर होत आहे. यामुळे आता मनपाला नवीन कर्मचाऱ्यांची गरज आहे. हेच लक्षात घेत येत्या आठवड्यात आकृती बांध मंजूर होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

jalgaon manapa

महापालिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या प्रत्येक महिनानिहाय कमी होत असून, ३२०० वर असलेली कर्मचारी संख्या आता १ हजार कर्मचाऱ्यांवर आली आहे. शहरातील सुमारे ६ लाख लोकसंख्येचा भार केवळ १ हजार कर्मचाऱ्यांवर आल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांवर देखील मोठा ताण पडत आहे. त्यामुळे मनपाच्या कामकाजावर परिणाम होत असून, महापालिकेतील रिक्त जागा त्वरीत भरल्या जाव्यात यासाठी शासनाकडे पाठविण्यात आलेला आकृतीबंध मंजुर होण्याबाबत महापौर जयश्री महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच आकृतीबंधाबाबत मुंबईत पुढील आठवड्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहिती मनपाच्या सुत्रांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now