⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

आ.चंद्रकांत पाटलांचा पाठपुरावा : मुक्ताईनगरात शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२२ ।  मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय यापूर्वी 50 खाटांचे होते, मात्र आमदारांच्या पाठपुराव्याने आता 100 खाटांच्या रुग्णालयास मान्यता मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

आ. चंद्रकांत पाटील यांचा गेल्या दोन वर्षापासून सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार मागील काळात रुग्णालयाला 100 खाटांचे श्रेणी वर्धनच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली होती. त्यानंतर आ. चंद्रकांत पाटील यांच्या सततच्या पाठपुराने सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे शासनाकडे शंभर खटांच्या रुग्णालयाच्या अंदाजपत्रक व नकाशे शासनाकडे निधी मागणीसाठी प्रस्तावित होते. यासाठी वेळोवेळी त्यांनी पाठपुरावा केल्याने शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 रोजी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाला 100 खाटांच्या रुग्णालय मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक: प्ररामा 2022/प्र. क्र.144/आरोग्य 3 मुंबई 400001 दि.18 नोव्हेंबर 2022 अन्वये रुग्णालय मुख्य इमारतीसाठी 1355.05 लक्ष तर निवासस्थानांसाठी 858.54 लक्ष इतक्या मोठ्या भरीव निधीसह अंदाज पत्रक व नकाशांना मंजुरी मिळाली आहे.

आ. चंद्रकांत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून मतदार संघातील गोरगरीब जनता तसेच अपघातग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा या निर्णयामुळे मिळाला आहे. मुक्ताईनगर मतदार संघाने आरोग्याच्या दृष्टीने मोठे पाऊल टाकल्याने या निर्णयाचे कौतुक होत आहे.