जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । अमळनेर येथील जुन्या पोलिस लाईन जवळ अवैधरीत्या वाहनात गॅस भरताना कार पेटल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेत एक जण जखमी झाला असून गॅस भरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११२ क्रमांकावर कॉल करून नागरिकांनी पोलिसांना माहिती कळवली होती.
पोलिस मिलिंद भामरे व सुनील पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चौकशी केली असता अनिल सुरेश चौधरी हा अवैधरीत्या ओम्नी वाहनामध्ये गॅस भरत असताना सिलिंडरचा स्फोट झाला. यात विनोद जानकीराम पारधी हे जखमी झाले.
चौकशी केली असता अनिल सुरेश चौधरी हा जय बिजासन माता स्वीट मार्टमध्ये अवैधरीत्या गॅस सिलिंडर बाळगून चारचाकी वाहनांमध्ये रिफिलिंग करत असल्याचे समोर आले. त्यामुळे अमळनेर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हे देखील वाचा:
- Jalgaon : तरुणाच्या खात्यातून एक लाख गायब; सायबर ठगांनी अशी केली फसवणूक?
- तुम्हालाही कुंभमेळ्याला जायचंय?; जळगाव, भुसावळ मार्गे धावणार विशेष ट्रेन
- डॉ. केतकी पाटील निर्मित संविधान दिनदर्शिकेचे मंत्री संजय सावकारेंकडून कौतुक
- ..म्हणून महिलांनी जळगाव महानगरपालिकेला कूलूप ठोकून केलं आंदोलन
- महाराष्ट्रातील ITI पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी; 800 जागांवर भरती, ‘इतका’ मिळेल पगार?