डॉ. केतकी पाटील निर्मित संविधान दिनदर्शिकेचे मंत्री संजय सावकारेंकडून कौतुक

जानेवारी 10, 2025 5:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र शासनाचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे (Sanjay Savkare) यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील यांनी संविधान कॅलेंडर भेट दिले. या प्रसंगी ना. सावकारे यांनी संविधानाला अंतर्भूत करणारी दिनदर्शिका पाहून कौतुक केले. तसेच डॉ केतकीताई पाटील यांचे अभिनंदन केले.

KP2

संविधानाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त संविधान पर्व साजरे केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ.केतकी पाटील यांनी संविधान प्रत्येकाला समजेल या स्वरूपात दिनदर्शिकेची निर्मिती करून घेतली. या दिनदर्शिकेवर एक क्यू आर कोड असून ते स्कॅन केल्यावर संविधान पाहिजे. त्या भाषेत उपलब्ध होण्याची सुविधा आहे. अशी हि संविधान दिनदर्शिका आज ना. संजय सावकारे यांना स्वतः डॉ केतकी ताई पाटील यांनी दिली. या प्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, सदस्य डॉ अनिकेत पाटील यावेळी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now