रविवार, डिसेंबर 10, 2023

आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का : जवळचा सहकारी शिवसेनेत

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२३ । महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना जवळ धक्का बसला आहे कारण त्यांच्या सर्वात विश्वासू मानल्या जाणाऱ्या सहकार्याने त्यांची साथ सोडली असून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे

एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व पदाधिकारी जात आहेत आणि दुसरीकडे ठाकरे गटाची गळती काही कमी व्हायला तयार नाहीये याचा प्रत्यय आज आला असून आदित्य ठाकरे यांच्या अतिशय निकटवर्गीय असलेले एका परळी करणे युवा सेना अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.

राहुल कनाल यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला जय महाराष्ट्र केला आहे. राज्याच्या उत्तुंग विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे राहुल कनाल यांनी म्हटले आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या युवासेना कोअर कमिटीतील पूर्वेश प्रताप सरनाईक, समाधान सदा सरवणकर, योगेश रामदास कदम, सिद्धेश कदम, अमेय घोले यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

प्रवेशावेळी सर्वांचा रोष हा युवासेनेच्या काही पदाधिकाऱ्यांवर होता. आता राहुल कनाल यांना देखील डावलण्यात आल्याचा दावा केला जात आहे. स्वाभिमानासाठी राहुल कनाल यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केल्याची चर्चा आहे.