---Advertisement---
भडगाव

भडगावातील ३८ वर्षीय तरुण बेपत्ता

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२२ । भडगाव शहरातील वाचनालय गल्लीतील 38 वर्षीय तरुण मी बाहेर जाऊन येतो असे घरी सांगून निघून गेला त्याचा शोध घेतला असता कुठेही आढळून आला नाही म्हणून भडगाव पोलिस स्टेशनला हरवल्याची नोंद दाखल करण्यात आली.

jalgoan 40 jpg webp

निरंजन प्रकाश पाटील (वय 38) तरुणाचे नाव आहे. हा तरुण शहरातील वाचनालय गल्लीत रहिवाशी असून दि. 27 रोजी सायंकाळी पाच वाजता मी बाहेर जाऊन येतो असे घरी सांगून निघून गेला असून याचा भडगाव शहरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला, परंतु मिळून न आल्याने मानसी निरंजन पाटील यांच्या खबरिवरून भडगाव पोलिस स्टेशनला हरवल्याची नोंद दाखल करण्यात आली आहे.

---Advertisement---

निरंजन प्रकाश पाटील यांचे वर्णन पुढील प्रमाणे 5 फूट, 5 इंच, शरीराने मध्यम, रंग- सावळा, चेहरा-गोल, दाढी व मिशी वाढलेली, डोळ्यांवर नजरेचा  चष्मा, अंगात पांढऱ्या रंगाचा कॉलरचा टी शर्ट, निळया रंगाची जीन्स पँट, काळसर रंगाची चप्पल, असलेला तरुण कुठेही आढळून आला तर भडगाव पोलिस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास पो. हे. काँ. विलास पाटील करत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---