गुन्हेजळगाव शहर

२४ वर्षीय तरुणाला “सध्या तु खूप हवेत उडत आहे” म्हणत फायटरने मारहाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२२ । शहरातील एका परिसरात २४ वर्षीय तरुणाचा रस्ता आडवित फायटरने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात शनीपेठ पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, शहरातील शंकरराव नगरातील महेश उर्फ मुकेश राजू निंबाळकर (वय-२४) हा मजूरी करुन उदनिर्वाह करतो. शुक्रवारी १ एप्रिल रोजी रात्री तो चौघुले प्लॉट परिसरात राहत असलेल्या त्याच्या आत्याकडे जेवणासाठी जात होता. त्याचवेळी हनुमान मंदिराच्या चौकात राकेश साळुंखे उर्फ लिंबू राक्या व गोलू परदेशी (पुर्ण नाव माहित नाही) हे दोघ भेटले. “सध्या तु खुप हवेत उडत आहे” असे म्हणत ते महेशला शिवीगाळ करु लागले. दरम्यान, त्या दोघांना महेश समजविण्यासाठी गेला असता, गोलू परदेशी याने महेशला पकडून ठेवले तर राकेश याने त्याच्या हातातील फायटरने चेहऱ्यावर व कपाळावर मारुन दुखापत करीत गंभीर जखमी केले. या प्रकरणी महेश निंबाळकर याने दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिसात राकेश साळुंखे उर्फ लिंबू राक्या, गोलू परदेशी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button