जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीतर्फे उपजिल्हाधिकारी महसूल शुभांगी भारदे यांना निवेदन देण्यात आले. त्यात उत्तर प्रदेशात लोकसभेचे खासदार ओवेसी यांच्या कारवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात यावी, कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी महिलां बाबत जे वक्तव्य केले ते निषेधार्थ आहे. त्यांनी खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा दारू संबंधी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यापुढे कोणीही महिलांची बदनामी करणार नाही तसेच भ्याड हल्ला होणार नाही याची शासनाने दक्षता घ्यावी अशी मागणी केली आहे.
निवेदनावर जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, सचिव अज़ीज शेख, उपाध्यक्ष सय्यद चाँद, खजिनदार ताहेर शेख, संचालक मोहसीन शेख, इक्बाल वजीर, अल्ताफ शेख, जुलकरनैन, हारून महबूब, सलीम मोहम्मद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांची यंदा होणार सेतू अभ्यासक्रमातून उजळणी
- चुकीच्या हाती आंदोलन गेल्याने कर्मचाऱ्यांचे नुकसानच झाले : संदीप शिंदे यांचा आरोप
- जळगावात ढगाळ वातावरणामुळे उकाडा पुन्हा वाढला, आज जिल्ह्यात पूर्वमाेसमी पावसाची शक्यता
- राज्यमंत्री बच्चु कडु उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, असे आहे दौऱ्याचे नियोजन
- जुन्या वादातून ७७वर्षीय वयोवृद्धाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज