अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत २० वर्षीय तरुणाने प्रस्तापित केले शरीरसंबंध

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२२ । अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेले व तिच्यावर शरीरसंबंध निर्माण करणा-या तरुणा विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहर पोलिस स्टेशनकात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलेश दारासिंग पावरा (20) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सुमारे दोन महिन्यापुर्वी गणेश उत्सव दरम्यान विलेश दारासिंग पावरा याने चोपडा तालुक्यातील मजरेहोळ येथे राहणा-या व शिक्षण घेणा-या अल्पवयीन मुलीला भुलथापा देवून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. लग्नाचे आमिष दाखवत त्याने तिला नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात तसेच शिरपूर नजीक महादेव दोंदवाडे येथे पळवून नेले. याठिकाणी त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले.

या घटनेप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला विलेश विरुद्ध भाग 5 गु.र.न. 437/2020 भा.द.वि. 376(1), (अ), 2 (एन), 363 अ, सह बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून सरंक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 4,8,5 (एल)12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. संतोष चव्हाण करत आहेत.