---Advertisement---
जळगाव शहर गुन्हे

आईला चहाच्या टपरीवर सोडून तो घरी परतला, आणि उचललं टोकाचं पाऊल ; अवघ्या 19 व्या वर्षीच सोडलं जग..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२३ । १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरातील सुप्रीम कॉलनीत उघडकीस आली. आकाश सुरेश शेरे (वय-१९) असं मयत तरुणाचं नाव असून त्याच्या आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

19 old young succied jpg webp webp

नेमका काय आहे प्रकार?
शहरातील सुप्रीम कॉलनीत आकाश शेरे हा आई सविता आणि लहान भाऊ दीपक यांच्यासोबत वास्तव्याला असून तो एमआयडीसी परिसरात चहाची टपरी चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजता आकाशाने आईला चहाच्या टपरीवर सोडून तो परत घरी आंघोळ करण्यासाठी आला होता.

---Advertisement---

दरम्यान त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश हा टपरीवर का आला नाही, त्यामुळे त्याची आई सविता यांनी घरी आल्या. घरात जाताच आकाशने छताला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसताच आईने एकच हंबरडा फोडला होता. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आईने आरडाओरड केल्यानंतर शेजारी राहणारे नागरिक व तरुणांनी एकच धाव घेऊन मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला.

वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणीअंती मयत घोषित केले. मयताच्या पश्चात आई सविता, भाऊ दीपक आणि दोन विवाहित बहीण असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---