---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

घरात घुसून 16‎ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग ; जळगावातील धक्कादायक घटना..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२३ । राज्यात महिलासंह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार कमी होता होत नसून अशातच जळगाव शहरातून एक धकाकदायक प्रकार उघडकीस आला आहे. पाणी पिण्याच्या निमित्ताने घरात घुसून १६‎ वर्षिय बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा‎ प्रकार केला. मात्र, लहान बहिणीने आराडाओरड‎ केल्याने टळला या‎ घटनेमुळे संतप्त जमावाने मद्यपी‎ तरुणाची धुलाई करून त्याची‎ दुचाकी पेटवून दिली.याप्रकरणी रात्री उशिरा बाललैगिंक‎ अत्याचार कायद्यान्वये तालुका पाेलिस‎ ठाण्यात गुन्ह्याची नाेंद करण्यात आली.‎

crime 3 1 jpg webp webp

नेमकी घटना काय?
जळगाव शहरातील काेल्हे हिल्स‎ परिसरात राहणारा वाॅचमन व मजुरी‎ करणाऱ्या कुटुंबातील पती-पत्नी हे‎ शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास‎ मासे पकडण्यासाठी गेले हाेते. तर दाेन्ही‎ मुले बकऱ्या चारण्यासाठी गेले असताना‎ घरी १६ वर्षिय मुलगी तिच्या सहा वर्षिय‎ बहिणीसाेबत हाेती.

---Advertisement---

त्यावेळी भरत सुभाष‎ सूर्यवंशी (वय ३४, रा. चंदुअण्णानगर,‎ जळगाव) हा आला. त्याने त्यांच्याकडे‎ पाणी मागीतले. ते घेण्यासाठी ती पीडित‎ मुलगी आत गेली. तिच्या मागे भरत हा‎ पण गेला. आत जाताच तिला माझ्याशी‎ दाेस्ती कर असे म्हणाला. तिने नाही‎ म्हणून तुम्ही आत का आलात? असे‎ विचारले. तेव्हा भरतने तिचे दाेन्ही हात‎ पकडून तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न‎ केला.

बहिणीशी वाईट वागताना‎ अनाेळखी व्यक्तीला‎ पाहून लहान बहिणीने‎ घराबाहेर जावून‎ अरोडाओरड केल्यानंतर परिसरातून काही जणांनी तरुणाला बाहेर आणत बेदम‎ मारहाण केली. या वेळी त्याची‎ दुचाकी (एमएच डीव‎ ७१७८) पेटवून दिली.‎ याप्रकरणी रात्री उशिरा बाललैगिंक‎ अत्याचार कायद्यान्वये तालुका पाेलिस‎ ठाण्यात गुन्ह्याची नाेंद करण्यात आली.‎

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---