⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | निकालाच्या दिवशी सोने दरात मोठी बदल ; पहा काय आहे भाव

निकालाच्या दिवशी सोने दरात मोठी बदल ; पहा काय आहे भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२४ । आज लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होत असून सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. केंद्रात कोणाची सत्ता येणार हे काही तासातच स्पष्ट होणार असून मात्र त्यापूर्वी सोने आणि चांदीत मोठी दणआपट झाली आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस पण मौल्यवान धातूंनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला होता.

सोने चांदीचे नवे दर जाहीर झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोने चांदीचे आजचे २२, २४ आणि १८ कॅरेटचे दर १०० रुपयांनी कमी झाले आहेत.

आजच्या २२ कॅरेट सोन्याच्या किंमती
आज २२ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ६,६२,४०० रुपये आहे. तर १० ग्राम सोन्याच्या किंमती ६६,२४० रुपये आहेत. तसेच ८ ग्राम सोन्याच्या किंमती ५२,९९२ रुपये आहेत. १ ग्राम सोन्याची किंमत ६,६२४ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती
२४ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ७,२२, ५०० रुपये आणि १० ग्राम सोन्याची किंमत ७२,२५० रुपये आणि ८ ग्राम सोन्याची किंमत ५७,८०० रुपये तर १ ग्राम सोन्याची किंमत ७,२२५ रुपये इतकी आहे.

जळगावात काय आहे भाव?
जळगाव सुवर्णबाजारात सोमवारी सोने दारात ४०० ते ५०० रुपयाची घसरण दिसून आली. सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७१९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे. दुसरीकडे चांदीचा दरही काल एक हजारापर्यंतची घसरण झाली असून यामुळे आता चांदीचा प्रति किलोचा दर विनाजीएसटी ९१००० रुपयावर आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.