⁠ 
रविवार, जानेवारी 5, 2025
Home | गुन्हे | जळगाव शहर पुन्हा हादरले ; गळा चिरून तरुणाचा खून

जळगाव शहर पुन्हा हादरले ; गळा चिरून तरुणाचा खून

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२४ । जळगाव जिल्ह्यात खुनाच्या घटनांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नसून अशातच शहरातून आणखी एका खुनाची घटना समोर आलीय. तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना जळगाव शहरातील नाथवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर घडली. ललित प्रल्हाद वाणी (वय-४५ रा. सिंधी कॉलनी) असं हत्या झालेल्या इसमाचे नाव असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

याबाबत असे की, शहरातील नाथवाडा परिसरात ललित वाणी हे सुप्रीम कंपनी गाडेगाव येथे कामाला आहे. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी ते नाथवाडा रस्त्याने कामावरून ते घरी येत होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेर वाळूवर त्यांचा मृतदेह मिळून आला.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने धाव घेतली. अज्ञात इसमानी त्यांच्या गळ्यावर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत हे घटनास्थळी पोहचले असून फॉरेन्सिक टीम नमुने घेत आहे. मयत ललित वाणी यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे. अज्ञात इसमानी त्यांच्या गळ्यावर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत हे घटनास्थळी पोहचले असून फॉरेन्सिक टीम नमुने घेत आहे.

दरम्यान, हा खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला याची माहिती अद्यापसमोर आलेली नाही पोलिसांनी मृतदेह उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष केल्याने वाणी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.