जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२४ । चालू आर्थिक वर्षात जीएसटी व्यवस्थेत व्यापक बदल पाहायला मिळू शकतो. याअंतर्गत जीएसटी दराचे रुपांतर सध्याच्या चार स्लॅबवरून तीन स्लॅब असलेल्या संरचनेत केले जाऊ शकते. या विषयाचे जाणकार असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
ते म्हणाले, जीएसटी कौन्सिल अंतर्गत केंद्र व राज्यांचे अधिकारी असलेल्या फिटमेंट समितीने जीएसटीचे दर तर्कशुद्ध बनवण्याच्या प्रक्रियेवर नव्याने काम सुरू केले आहे. यात काही दर आणि खास करून १२ टक्के दर हटवण्याची शक्यता शोधली जात आहे. सध्याच्या दर संरचनेत ५%, १२%, १८% असे स्टैंडर्ड दर आणि २८% इतक्या कमाल दराचा समावेश आहे. याशिवाय यात काही वस्तू आणि सेवांसाठी शून्य आणि विशेष दरही आहेत. अधिकारी म्हणाले, करांचे दर आणि त्यात संभाव्य सुधारणांसाठी फिटमेंट समिती इनपुट तयार करत आहे. हे इनपुट जीएसटी दरांमध्ये बदलाचा सल्ला देण्यासाठी जीएसटी कौन्सिलद्वारे बनवण्यात आलेल्या मंत्री गटासमोर ठेवले जाईल. दर तर्कशुद्ध बनवण्यासाठी राज्यांच्या मंत्र्यांसह सात सदस्यीय गटाचे नेतृत्व युपीचे अर्थमंत्री सुरेश खन्ना करत आहेत.
१२ टक्के जीएसटीच्या कक्षेत या १० वस्तू
लोणी तूप संगणक प्रक्रिया केलेल अन्नपदार्थ बदाम, मोबाइल, फळांचा रस, भाज्या, सुका मेवा, फळे किंवा इतर वस्तू डबाबंद नारळ पाणी छत्री