जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२४ । जळगाव जिल्ह्यात सध्या सूर्य आग ओकत असून उष्णतेच्या लाटेने जळगावकर हैराण झाले आहे. रविवारी तर तापमानाने नवा उच्चांक गाठला. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमाल तापमानने ४४ अंशाचा टप्पा गाठला. तापमान वाढीने प्रचंड उकाडा जाणवत असून या उकाड्यापासून कधी सुटका होणार, याची जळगावकर असोशीने वाट पाहत आहेत. मात्र, आगामी आणखी चार दिवस उष्णतेच्या लाट काय राहणार असून या दरम्यान तापमान ४५ अंशावर जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे
याआधी हवामान विभागाकडून १९ ते २४ मे दरम्यान जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशातच उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार रविवारी शहरात तब्बाल ४४ अंश एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान, आज सोमवारपासून तापमानात अजून एक किंवा दोन अंशाची वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसात पारा ४५ ते ४७ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत सकाळी ११ वाजेपर्यंत घराबाहेरील कामे उरकून घेण्याची गरज आहे. तसेच दुपारच्या वेळेस घराबाहेर आणणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुढील आठवड्यात जिल्ह्यात पावसाची शक्यता
गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात व परिसरात पाऊस होऊन गेला आहे. त्यानंतर आता वातावरण पुन्हा कोरडे झाले आहे. त्यामुळे गुजरात, राजस्थानकडून रोष्णारे उष्ण वारे सक्रिय झाले आहे. त्यामुळे पारा वाढला आहे. आठवडाभर तापमान वाढलेले राहिल. मात्र त्यानंतर म्हणजेच पुढील आठवड्यात जळगाव जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो. त्यामुळे तापमानात पुन्हा घट होईल. २६ मे नंतर मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला.