जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२४ । उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये होत असलेली प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने ओखा-मदुरै-ओखा उन्हाळी विशेष रेल्वे गाडीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ही साप्ताहिक रेल्वे आता २८ जूनपर्यंत धावणार आहे. या गाडीला अकोला येथे थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.
मध्य रेल्वेने जारी केलेल्या पत्रकानुसार, ०९५२० ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २४ जून २०२४ पर्यंत दर सोमवारी २२:०० वाजता प्रस्थान स्थानकावरून रवाना होऊन चौथ्या दिवशी मदुरै स्थानकावर ११:४५ वाजता पोहोचणार आहे. ही गाडी दर मंगळवारी २२:१५ वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. परतीच्या प्रवासात ०९५१९ मदुरै-ओखा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २८ जून २०२४ पर्यंत दर शुक्रवारी १:१५ वाजता स्थानकावरून रवाना होऊन तिसऱ्या दिवशी १०:२० वाजता ओखा स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी दर शनिवारी सकाळी १० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.
या स्थानकांवर आहेत थांबा :
ही गाडी द्वारका, जामनगर, राजकोट, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडियाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, अकोला, पूर्णा, ह.साहिब नांदेड, निजामाबाद, काचीगुडा, महबूबनगर डॉन, गूटी , रेनिगुंटा, कटपाडी, वेल्लोर कॅन्टोन्मेंट, तिरुवन्नमलाई, विल्लुपुरम, श्रीरंगम, तिरुचिरापल्ली, मानापराई, दिंडीगुल, कोडाईकनाल रोड आणि कुडालनगर स्टेशन.