⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | उज्ज्वल निकमांनी दिला विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा

उज्ज्वल निकमांनी दिला विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२४ । भारतीय जनता पार्टीने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधून उज्ज्वल निकम यांनी उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याआधी उज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य सरकारने निकम यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आज उज्वल निकम आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्जांची छाननी उद्या केली जाणार आहे.

उत्तर मध्य मुंबईतून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निकम यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला आहे. उज्वल निकम हे कायमच हायप्रोफाईल केससमुळे चर्चेत येत असतात. उज्ज्वल निकम यांचा जन्म 30 मार्च 1953 साली झाला. सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले. उज्ज्वल निकम यांना ’प्रमोद महाजन’ स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

उज्ज्वल निकम हे विशेष सरकारी वकील आहेत. ज्यांनी प्रामुख्याने हत्या आणि दहशतवादाच्या खटल्यांवर काम केले आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण आणि 2008 च्या मुंबई हल्ल्यातील संशयितांवर खटला चालवण्यास त्यांनी मदत केली. 2013 मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण, 2016 कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणात ते विशेष सरकारी वकील देखील होते. 26/11 मुंबई हल्ल्याच्या खटल्यात राज्याच्या वतीने उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.