जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२४ । गेल्या काही दिवसापासून जळगावातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. तापमान वाढल्यामुळे उकाड्याचे प्रमाण वाढले असून यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच गेल्या तीन-चार दिवसांपासून सकाळच्या वेळेस ढगाळ वातावरण तर दुपारनंतर मात्र कडाक्याचे ऊन पडत आहे. आगामी काही दिवस तरी जळगावकरांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
रविवारी देखील जळगाव शहराचा पारा ४२ अंशांपर्यंत पोहोचला होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील पारा ४० अंशांच्या पुढेच राहणार आहे. सकाळच्या वेळेस वातावरण काही अंशी ढगाळ राहत आहे. त्यातच बाष्पाचे प्रमाणदेखील वाढले आहे. तापमानात वाढल्यामुळे उकाड्याचे प्रमाण वाढले आहे
आगामी पाच दिवस असे राहणार तापमान
आज २९ एप्रिल रोजी दिवसाचे तापमान ४२ अंश राहील,
३० एप्रिल रोजी तापमान ४२ अंशपर्यंत असेल तर मुख्यत्वेकरून कोरडे वातावरण राहील.
१ मे रोजी तापमान ४१ अंशपर्यंत तापमान राहील, तर हवामान कोरडे राहील
२ मे रोजी तापमान ४१ अंशपर्यंत राहील. तर हवामान कोरडे राहील
३ मे रोजी तापमान ४२ अंश राहील. तर वातावरण काही अंशी ढगाळ