उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी स्मिताताईंनी घेतले देवाचे दर्शन !

एप्रिल 25, 2024 11:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२४ । जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या स्मिताताई वाघ आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी स्मिताताई वाघ यांनी शहरातील गोलानी मार्केट येथील जागृत देवस्थान असलेल्या मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेत देवाला विजयासाठी साकडे घातले आहे.

smitatai vagh jpg webp

काल बुधवारी महाविकास आघाडीच्या जळगाव आणि रावेरमधील उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर आज जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिताताई वाघ आणि रावेर लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

स्मिताताई वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गोलानी मार्केट मधील मारुती मंदिरात विजयी होण्यासाठी देवाला साकडे घातले. विधिवत पूजा अभिषेक करत स्मिताताई वाघ यांनी विजय होण्यासाठी देवाला प्रार्थना केली. दरम्यान, नेत्यांची कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची तसेच जनतेची मोठी साथ मला लाभणार आहे . परमेश्वराची मला साथ मिळावी, तू मला लोकसभेत जाण्याची संधी मिळावी यासाठी देवाला प्रार्थना केली,अस स्मिताताई वाघ म्हणाल्या.

दरम्यान, दुसरीकडे रावेरच्या उमेदवार रक्षा खडसेंनी देखील त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेतले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now