⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | नोकरी संधी | रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांवर मेगाभरती ; 10वी/ग्रॅज्युएट्स उमेदवारांना सुवर्णसंधी!

रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांवर मेगाभरती ; 10वी/ग्रॅज्युएट्स उमेदवारांना सुवर्णसंधी!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही दहावी किंवा पदवी पास असाल तर तुमच्यासाठी रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे सुरक्षा दलात (RPF Recruitment 2024) महाभरती निघाली असून ही भरती प्रक्रिया कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या पदांसाठी पार पडत आहे. या भरतीद्वारे एकूण 4660 जागा रिक्त आहेत. लक्ष्यात ठेवा, 14 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, त्यापूर्वीच आपल्याला भरतीसाठी अर्ज करावी लागतील. RPF Bharti 2024

रिक्त पदाचा तपशील :
1) सब इंस्पेक्टर (Sub Inspector) – 452
2) कॉन्स्टेबल (Constable)- 4208
शैक्षणिक पात्रता:
सब इंस्पेक्टर:
कोणत्याही शाखेतील पदवी.
कॉन्स्टेबल: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट :
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आली असून सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 20 ते 25 असणे आवश्यक आहे. तर कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमदेवाराचे वय हे 18 ते 28 असणे आवश्यक आहे.
इतका फी लागेल :
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमदेवाराला 500 रूपये फीस ही द्यावी लागेल. प्रवर्गातील उमदेवारांना 250 रूपये फीस ही भरावी लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024 (11:59 PM)
Online अर्ज: Apply Online
जाहिरात (Notification):
पद क्र.1: पाहा
पद क्र.2: पाहा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.