⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 26, 2024
Home | जळगाव जिल्हा | 15 वर्षांपासून मद्याची सवय जडलेला युवक व्यसनमुक्त

15 वर्षांपासून मद्याची सवय जडलेला युवक व्यसनमुक्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या संकल्प व्यसनमुक्ती केंद्रात समुपदेशन यशस्वी

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२४ । १५ वर्षापासून मद्य पिण्याची सवय जडलेल्या ३६ वर्षीय युवकावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाच्या संकल्प व्यसनमुक्ती केंद्रात यशस्वी उपचार झाले. तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून हा युवक आता व्यसनमुक्त झाल्याने सुखी आयुष्य जगण्याच्या मार्गाला लागला आहे.

याबाबत माहिती अशी की, भुसावळ येथील ३६ वर्षीय युवक दैनंदिन आयुष्य जगत असतांना मित्रांच्या संगतीने व्यसनाच्या मार्गावर लागला होता. सुरूवातीला थोडे-थोडे मद्य सेवन करण्याची सवय ही कालांतराने वाढतच गेली. सन २०१५ मध्ये या युवकाच्या वडीलांचे निधन झाले. घरातील धाक असलेली व्यक्तीच गेल्याने या युवकाच्या व्यसनाच्या प्रमाणात अधिकच वाढ झाली. काही दिवसांनी त्याच्या आईने त्याचे लग्न करून दिले. लग्नानंतर तरी परीस्थिती सुधारेल अशी आशा त्या मायमाऊलीला होती. मात्र ही आशा देखिल फोल ठरली.त्याचेे मद्य पिण्याचे प्रमाण पुन्हा वाढू लागले. पतीच्या मद्याच्या सवयीमुळे पत्नीदेखिल त्याला सोडून गेली. त्याचा घटस्फोट झाला. या निराशेत हा दिवसा देखिल मद्याचे सेवन करू लागला.

अखेर काही दिवसांनी त्याच्या आईने त्याला मुंबई येथे त्याच्या बहिणीकडे घेऊन गेली. याठिकाणी नाईट वॉचमन म्हणून त्याला कामाला लावले. रात्रपाळीतही तो मद्याचे सेवन करीत असे. काही दिवसांनी तो भुसावळ तालुक्यातील त्याच्या गावी घराचे काम करण्यासाठी परतला. याठिकाणी तो एकटाच राहत असल्याने दिवसभर मद्याच्या नशेत राहत असे. अखेर त्याला उलट्या आणि थरथर कापत होता. चिडचीडही वाढली होती. अशा परीस्थितीत त्याला डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या संकल्प व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी विभाग प्रमुख डॉ. विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हुमेद महाडीक, डॉ. विकास गायसमुद्रे, डॉ. सौरभ भुतांगे, डॉ. आदीत्य जैन, डॉ. हिमांशू जाधव, डॉ. उमा चांदूरकर यांनी नीलेशवर उपचार सुरू केले. या उपचाराला अवघ्या सहाच दिवसात यश आले. आता प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असून व्यसनमुक्त झाला आहे.

समाजात अनेक कारणांमुळे तरूणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. आजची पिढी ही सहजरित्या व्यसनाच्या चक्रव्युहात अडकत चालली आहे. भावी पिढी ही देशाचे भविष्य आहे. त्यामुळे त्यांना व्यसनांपासून परावृत्त करण्याची जबाबदारी संकल्प व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. संकल्प व्यसनमुक्ती केंद्रात केवळ समुपदेशनच नव्हे तर योग्य उपचार देखिल केले जातात. आपल्या आसपासच्या परिसरात असे व्यसनाधीन रूग्ण असल्यास तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात संपर्क साधावा. कुठलाही दावा आमचा नसला तरी फालोअपला आल्यावर नातेवाईक किंवा रूग्णच याबाबत आम्हाला खात्री करून देतो की मी आता व्यसनमुक्‍त झालो आहे.

  • डॉ. उमा चांदूरकर
    निवासी डॉक्टर मानसिक रोग विभाग
author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.