⁠ 
सोमवार, मे 13, 2024

भाजपच्या महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची संभाव्य यादी समोर ; जळगाव, रावेरमध्ये उमेदवार कोण?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 6 मार्च 2024 । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही दिवसापूर्वी भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. यामुळे भाजपच्या महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची संभाव्य यादी समोर अशातच भाजपच्या महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे.

यात उमेदवारांची निवड करताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने आपल्या लौकिकाप्रमाणे धक्कातंत्राचा पुरेपूर वापर केल्याचे दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारांची नावे समोर आली. त्यात विद्यमान खासदार उन्मेष पाटील किंवा ए टे नाना पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे रावेरच्या लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निर्णय घेण्यात आल्याचे दिसत आहे. संभाव्य यादीनुसार रावेरमध्ये नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार आहे.

रावेरमध्ये रक्षा खडसे यांच्याऐवजी डॉ. केतकी पाटील किंवा अमोल जावळे यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून भाजप 32 जागा लढवण्यावर ठाम आहे, पण या 32 जागांपैकी काही जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस काही जागांवर आग्रही आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत असून महायुतीमधील जागावाटपाचा तिढा लवकरच सुटणार असल्याचे बोलले जात आहे. तशातच भाजपच्या ३२ संभाव्य जागांवरील संभाव्य उमेदवारांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

भाजपच्या संभाव्य 32 लोकसभा उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे
पुणे : मुरलीधर मोहोळ
धुळे : सुभाष भांबरे यांच्याऐवजी प्रदीप दिघावकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता.
हिंगोली : हेमंत पाटील यांच्या जागेसाठी भाजपा आग्रही असून त्याठिकाणी भाजपच्या तानाजी मुरकुटे यांना संधी मिळण्याची शक्यता.
जालना : रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता.
चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला पाठवले जाण्याची शक्यता.
नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कायम ठेवले जाणार.
नंदूरबार : हिना गावित किंवा विजयकुमार गावीत.
अकोला : संजय धोत्रे
ईशान्य मुंबई : मनोज कोटक
सोलापूर : सिद्धेवर महाराज यांच्याऐवजी अमर साबळे यांना मिळण्याची शक्यता.
कोल्हापूर : सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा आग्रही आहे.
भंडारा-गोंदिया : सुनिल मेंढे
बीड : विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे
माढा – रणजितसिंह निंबाळकर

गडचिरोली : अशोक नेते यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम भाजपच्या चिन्हावर लढू शकतात.
भिवंडी : कपिल पाटील
सांगली : संजयकाका पाटील यांच्याऐवजी काँग्रसचे विशाल पाटील भाजपा पक्ष प्रवेश करून लढू शकतो.
सातारा : उदयनराजे भोसले
जळगाव : उन्मेष पाटील किंवा ए टी नाना पाटील.
दिंडोरी : भारती पवार
रावेर : डॉ. केतकी पाटील किंवा अमोल जावळे
उस्मानाबाद : बसवराज पाटील (नुकताच बसवराज पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केलाय)
उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मिळण्याची शक्यता.
संभाजीनगर : विद्यामन मंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड.
उत्तर मध्य मुंबई : पुनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार यांना मिळण्याची शक्यता.
ठाणे : डॉ.संजीव नाईक यांना मिळण्याची शक्यता. (ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे. मात्र, भाजपा घेण्यास आग्रही आहे )
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे.( रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अजूनही वाद सुरु आहे. शिंदे गटाकडून किरण सामंत लढण्यास इच्छुक आहेत )
दक्षिण मुंबई : राहूल नार्वेकर
नांदेड : मिनल खतगावकर (अशोक चव्हाण यांची भाची.आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतलेली )
राजेंद्र गावीत : सध्या राजेंद्र गावित शिंदे गटात आहेत. मात्र, ते भाजपा पक्षप्रवेश करून भाजपा तिकीटावर लढतील अशी शक्यता आहे.
अहमदनगर : सुजय विखे पाटील किंवा राम शिंदे.सध्या नगरमध्ये वाद सुरू आहे.
अमरावती : नवनीत राणा यांचा भाजपा पक्षप्रवेश होईल. मात्र, नवनीत राणा यांचा जातीच्या प्रमाणपत्रावरून वाद सुरू आहेत. या जागेवर आनंदराव अडसूळ हेदेखील आग्रही आहेत.